Madure - Pernem Tunnel | X

मागील काही दिवसात कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. यावेळी सावंतवाडी-गोवा दरम्यान असणार्‍या मालपे (पेडणे-गोवा) च्या बोगद्यात  (Pernem Tunnel) पाणी शिरल्याने कोकण रेल्वेची (Konkan Railway) सेवा विस्कळीत झाली आहे. पाण्यासोबत चिखलही असल्याने काही ट्रेन्स रद्द झाल्या आहेत तर काहींना वळवण्यात आलं आहे. दरम्यान रद्द झालेल्या ट्रेनचं रिफंड प्रवाशांना दिलं जाणार आहे.

मदुरे पेडणे ( Madure - Pernem section) मध्ये रूळाखालून पाणी येत असल्याने गोवा कडे जाणार्‍या काही ट्रेन्स सिंधुदुर्गामध्ये थांबवून ठेवण्यात आल्या आहेत तर गोव्यातून मुंबई कडे येणार्‍या रेल्वे गाड्या गोव्यामध्येच थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. बोगद्यामधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रेल्वे अभियंतांची टीम रवाना झाली आहे. सध्या परिस्थिती सुधारून पुन्हा रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी (0832) 2706480 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.  Ashadhi Ekadashi Special Trains By CR: मध्य रेल्वे कडून आषाढी एकादशी निमित्त 64 विशेष ट्रेन्सची घोषणा; पहा संपूर्ण वेळापत्रक .

कोकण रेल्वे मार्गावर रद्द करण्यात आलेल्या गाड्या

22229 CSMT - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस

12051 CSMT - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

10103 CSMT - मडगाव मांडवी एक्सप्रेस

12133 CSMT - बेंगलुरु एक्सप्रेस

10104 मडगाव मुंबई - CSMT मांडवी एक्सप्रेस

50108 मडगाव - सावंतवाडी रोड पॅसेंजर

22120 मडगाव - CSMT तेजस एक्सप्रेस

12052 मडगाव - CSMT जनशताब्दी एक्सप्रेस

10106 सावंतवाडी - दिवा

कोकण रेल्वे मार्गावर वळवण्यात आलेल्या गाड्या

काल रात्री वाहतूक काही काळ बंद होती मात्र पाणी ओसरल्यानंतर मर्यादित वेगात गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या मात्र आज सकाळी पुन्हा पाणी-चिखल असल्याने आता वाहतूक रखडली आहे.