Indian Railways | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर आज (21 जून) प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याने रेल्वेचं वेळापत्रक आज बिघडणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या 3 तासांसाठी हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या वेळेत काही रेल्वे गाड्यांचा प्रवास रोखला जाणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉक मुळे 11003 दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस रोहा ते रत्नागिरी दरम्यान 3 तास रोखली जाणार आहे. 16346 तिरूअनंतपुरम ते एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस उडपी ते कणकवली दरम्यान 3 तास थांबवली जाणार आहे. 10106 सावंतवाडी ते दिवा एक्सप्रेस देखील सावंतवाडी ते कणकवली दरम्यान 3 तास थांबवली जाणार आहे. मेगाब्लॉक मुळे या ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल केला जाणार आहे. नक्की वाचा: Konkan Railway Monsoon Time Table 2023: 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वे धावणार मान्सून विशेष वेळापत्रकानुसार.

पहा ट्वीट

मेगाब्लॉक दरम्यान देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर 10 जून पासून पावसाळी वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 37 गाड्यांचा वेग मंदावला आहे. सध्या या गाड्यांचा वेग 40 किलोमीटर प्रतितास करण्यात आला आहे. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ही वेगमर्यादा करण्यात आली आहे. त्यामध्ये आज मेगाब्लॉक घेतला असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.