Pune (Photo Credits: IANS)

29 जूनला पुण्यामध्ये कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या विपुल अग्रवाल (Vipul Agrawal) आणि विवेक अग्रवाल (Vivek Agrawal) या दोन्ही बिल्डर्सच्या पोलिस अटकेत वाढ झाली आहे. 6 जुलै पर्यंत या दोन्ही बिल्डर्सना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुणे: कोंढवा दुर्घटनेची सखोल चौकशी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश 

कोंढवा दुर्घटनेमधील मृत मजूर हे बिहार राज्यातील होते. त्यांच्या मूळगावी मृतदेह पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. सध्या या दुर्घटनेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली सहाजणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यांचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.

29 जूनपासून महाराष्ट्रात धुव्वाधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई परिसरात संरक्षक भिंती कोसळून दुर्घटना होत आहेत. आजही मुंबईतील मालाड, पुण्यात आंबेगाव परिसरात भिंत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत.