कोल्हापूर शहरातील निर्बंध 5-9 जुलै पर्यंत हटवले; पण 'हे' नियम असणार लागू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

Kolhapur: राज्यात कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम आहे. मात्र काही ठिकाणी लॉकडाउनचे नियम शिथील केले असून नव्या गाइडलाइन्स सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर आता कोल्हापूर शहरातील निर्बंध हे आजपासून (5 जुलै) ते 9 जुलै पर्यंत हटवण्यात आले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी वेळ सुद्धा नियोजित करुन देण्यात आली आहे. निर्बंध हटवण्यासंदर्भातील निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरातील निर्बंध जरी हटवले असले तरीही नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर गर्दी झाल्यास पुन्हा कठोर निर्बंध लावू असा इशारा सुद्धा नागरिकांना दिला आहे. मात्र कोल्हापूर मध्ये ग्रामीण भागात निर्बंध कायम आहेत. येथील निर्बंध हटवण्यासाठी आणखी काही काळ नागरिकांना वाट पहावी लागणार आहे.(Delta Plus Variant: मुंबई सह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 निर्बंध; पहा काय सुरु आणि बंद?)

तर दुसऱ्या बाजूला  कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्र सरकारने शनिवारी साताऱ्यामध्ये पुढील 8 दिवसांसाठी पूर्ण लॉकडाउन जाहीर केला आहे. अधिकृत आदेशानुसार, जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध लावण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवासुविधांमधील नागरिकांना सूट दिली गेली आहे. अन्य सर्व गोष्टी पुढील आठ दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत. आवश्यक वस्तूसंबंधित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत.अधिकृत आदेशानुसार, निर्बंध सोमवार ते शुक्रवार दरम्यान लागू असणार आहेत. तर विकेंड (शनिवार-रविवारी) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली. कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंडला लॉकडाउन असणार आहे.