Kolhapur Flood:पूरग्रस्तांसोबतच्या सेल्फीवर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण; नेते मंडळींना फक्त 'राजकारण' दिसतं
Girish Mahajan (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात सध्या सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात मागील सहा दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. पूराच्या वेढ्यात अडकलेल्यांची पाण्यातून सुटका करण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामध्येच अनेक नेते मंडळी देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दौर्‍यावर अशामध्येच गिरीश महाजन (Girish Mahajan) देखील पूरग्रस्तांसोबत सेल्फी घेताना दिसले. त्यावरून ट्रोलही झाले. आता त्यांनी या गोष्टीवर आपलं स्पष्टीकरण दिले आहे.

गिरीश महाजन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढला. त्यांना 'नाही' म्हणू शकले नाही. पूरस्थिती गंभीर आहे. लोकं संकटांत आहेत पण नेते मंडळींना फक्त 'राजकारण' दिसतं. अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.  कोल्हापूर येथील पूरस्थितीचे गांभीर्य विसरुन गिरिश महाजन सेल्फी घेण्याच्या नादात, राज ठाकरे यांनी केली टीका

ANI Tweet

कोल्हापूर येथे पूरग्रस्तांच्या भेटीसाठी जलसंपदामंत्री गिरिश महाजन (Girish Mahajan) केले होते. मात्र त्यावेळी गिरिश महाजन यांनी तेथील पूरस्थितीचे गांभीर्य विसरुन सेल्फी घेण्याच्या नादात दिसून आले. तसेच सेल्फी घेत असताना बोटीमधील पोलीसांसोबत हसत असल्याचे दिसले. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली होती.

सध्या कोल्हापूर, सातारा, सांगली भागामध्ये पूरात अडकलेल्यांची मदत करण्यासाठी NDRF ची पथकं, लष्कर, सैन्य, नेव्हीची पथकं आहेत.