Kolhapur Female Constable Commits Suicide: महिला कॉन्स्टेबलची कौटुंबिक वादातून गळफास लावून आत्महत्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Kolhapur Female Constable Commits Suicide: कोल्हापूर (Kolhapur) पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने कौटुंबिक वादातून गळफास लावून आत्महत्या (Woman Police Constable Suicide) केली. योगिनी सुकुमार पवार (Yogini Pawar) (वय 36) असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे. कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये आज दुपारी ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पवार यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी योगिनी यांची सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. (हेही वाचा - Nagpur: अग्निशमन दलाचे नागपूर शहरात प्रात्यक्षिक, आग लागल्यावर घ्यायच्या दक्षतेबाबत जनजागृती)

महिला कॉन्स्टेबल योगिनी पवार यांनी या सुसाईड नोटमध्ये पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. कौटुंबिक वादातून पवार यांनी स्वतःची जीवन यात्रा संपवली. या घटनेने संपूर्ण कोल्हापूर पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाहूपूरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे योगिनी पवार यांच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिलाने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाचं आता कोल्हापूरातील महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. या घटनेची चौकशी पोलिस करत आहेत.