Photo Credit- Twitter

Kolhapur Drunk Police : पोलीस हे राज्यात शांतता, सुव्यवस्ठा राखण्याचे काम करतात. पण एका पोलिसाने मात्र पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगल्याची माहिती समोर आली आहे. भुदरगड पोलीस ठाण्यातील एक पोलीस एका हॉटेलमध्ये गेला. तिथं तो दारू प्यायला. इतकी दारू प्यायला (Kolhapur Drunk Police)की नशेत त्याने खाकीचा माज दाखवायला सुरूवात केली. पोलीस म्हणून त्याने हॉटेलचं बिलच देण्यास नकार दिला.अनेकवेळा सांगूणही त्यान बिल देणे टाळले. अखेर रागाच्या भरात त्याने बिल मागणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण ( beaten up hotel employee)केली. तानाजी विचारे असं या हॉटेलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. (हेही वाचा :Beed Police Suicide: बीडमध्ये सहाय्यक पोलिस निरिक्षकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट)