Kokan Weather Prediction,July19 : कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकणात आज रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाची हजेरी कायम सुरू आहे. यामुळे कोकणातील नदी व नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. आज ही कोकणात घाटमाथ्यावर मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या लांजया तालुक्यातील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्या खाली गेल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री पासून लांजया तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळे अंजणी नदी पातळी बाहेर वाहू लागली आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुढील 3 दिवस कोकणात अती मुसळधार पाऊसाचा इशारा आहे. व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी वर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क रहान्याच आव्हान करण्यात आल आहे. आता कोकणात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने कोकणातील उद्याचे हवामानाचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow : पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

कोकणातील उद्याचे हवामान कसे?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने 19 जुलैरोजी मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने रायगडसाठी रेड अलर्ट तर उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून, विविध शहरांमध्ये पूर आणि वाहतूक कोंडी झाली आहे. आयएमडीने सांगितले की, मान्सून खाली सरकण्यास सुरुवात झाली आहे आणि कर्नाटक, केरळ आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीवर येत्या काही दिवसांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल.