मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) शिवसेना (Shiv Sena) नेत्या किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) 29 ऑक्टोबरला हजर राहण्याचे देश देण्यात आले होते. पण त्यादिवशी हजेरी न लावल्याने आता पेडणेकरांना पुन्हा एकदा नव्याने समन्स (Summons) बजावण्यात आला होता. तर आज एसआरए घोटाळ्या (SRA Scam) प्रकरणी किशोरी पेडणेकरांनी दादर पोलिस (Dadar Police Station) ठाण्यात हजेरी लावली. तरी भाजप नेते किरिट सोमय्या (BJP Leader Kirit Sommaiya) यांनी पेडणेकरांवर गंभीर आरोप केलेले आहेत. एसआरएच्या (SRA) एका नाही तर अनेक घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांचा हात असल्याचा आरोप करत किरिट सोमय्यांनी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे. किशोरी पेडणेकरांविरुद्ध किरीट सोमय्यांची आक्रमक भूमिका घेतल्याने आता किरिट सोमय्यांच्या रडारावर किशोरी पेडणेकर आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे. तर आज चौकशीला उपस्थित राहत किशोरी पेडणेकरांनी या कारवाई विरुध्द प्रत्युत्तर दिले आहे.
तर या पोलिस चौकशीनंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. कर नाही त्याला डर कशाचा अशी प्रतिक्रीया किशोरी पेडणेकरांनी पोलिस चौकशी नंतर दिली आहे. माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. मी कोणाकडून एक पैसाही घेतला नाही. याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. तरी किशोरी पेडणेकरांमागे लागलेला पोलिस चौकशीचा हा ससेमिरी याबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Politics: कडू विरुध्द राणा वाद अखेर मिटला पण बच्चू कडू म्हणतात..)
All allegations levelled against me are false & baseless. I didn't take a single penny from anyone. I'll soon meet CM Shinde and State home minister Devendra Fadnavis regarding this matter: Kishori Pednekar, Former Mumbai Mayor and Shiv Sena (Thackeray faction) leader pic.twitter.com/zTdVZoaXCW— ANI (@ANI) November 1, 2022
एसआरए घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार केली होती अशी माहिती किरिट सोमय्या कडून देण्यात आलेली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी झाली नाही असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. तरी आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये हा घोटाळा योग्यरित्या पुढे येईल अशी अपेक्षा किरिट सोमय्यांनी व्यक्त केली आहे. किशोरी पेडणेकरांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून व्हावी अशी मागणी आता सोमय्यांनी केली आहे.