SRA Flats Scam प्रकरणी आज (1 नोव्हेंबर) मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दादर पोलिस स्टेशन (Dadar Police Station) मध्ये हजेरी लावली आहे. किशोरी पेडणेकर यांना काही दिवसांपूर्वी त्याबाबतचा समंस बजावण्यात आला होता. त्यानुसार आज त्या पोलिसांसमोर हजर झाल्या आहेत.
दरम्यान भाजपा नेते किरीट सौमय्या यांच्याकडून किशोरी पेडणेकर यांच्यावर मागील काही दिवसांत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका किशोरी पेडणेकर यांनी हस्तगत केल्या आहेत असा त्यांचा आरोप आहे. तर पेडणेकरांनी हे आरोप धादांत खोटे असल्याचं म्हटलं आहे. दोन वर्षांपूर्वी सर्व माहिती दिलेली असतानाही किरीट सोमय्या वारंवार तीच कागदपत्रं दाखवून आरोप करत असल्याचंही त्या म्हणाल्या आहे.
Maharashtra | Former Mumbai Mayor and Shiv Sena (Thackeray faction) leader Kishori Pednekar arrives at Dadar Police Station, Mumbai after being summoned in connection with SRA flats scam. pic.twitter.com/fMu7GRFwTm
— ANI (@ANI) November 1, 2022
किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण
किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेले आहे. धादांत खोटं बोलून व आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचा षडयंत्र चालू झालेल आहे. SRA गाळ्यांन बाबत केलेल्या आरोपांचं स्वतः एस आर ए या प्राधिकरणाने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. pic.twitter.com/74nn2WIGkw
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) October 30, 2022
किशोरी पेडणेकर यांनी या आरोप-प्रत्यारोपाच्या तणावामधून आपल्याला सासूबाईंनाही गमावल्याचं म्हटलं आहे. 31 ऑक्टोबर दिवशी किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाईंचं निधन झालं आहे. सतत येणार्या उलट सुलट बातम्यांचा सासूबाईंच्या तब्येतील कळत नकळत परिणाम झाला असावा. त्यांचं वयही झालं होतं पण त्यांचं अचानक लक्षणं नसताना त्यांंचं जाणं यामागे या प्रकरणाचा त्रास होता असेही त्या मीडीयाशी बोलताना म्हणाल्या आहेत. दरम्यान येत्या काही दिवसात किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील भेट घेऊन बोलणार असल्याचं वृत्त समोर आले आहे.