Mumbai News: शहरात अपहरण करून मुलांचे तस्करीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. दरम्यान भांडूप येथून एका मुलीचे अपहरण करून तस्करी करणाऱ्या 4 महिलांना पोलिसांनी अटक केले आहे. 23 मार्चला मुलीचे अपहरण केले होते. पोलिसांनी अपहरणानंतर 12 तासांत आरोपींना अटक केले आहे. या धक्कादायक घटनेमुळे भांडूप परिसरात एकच खळबळ उडाली आहे.( हेही वाचा- खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला, मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली
मिळालेल्या माहितीनुसार, होळी निमित्त सर्वीकडे उत्सव साजरा केला जात होता. सोमवारी पीडित मुलगी रंगपंचमी साजरी करण्यासाठी जवळच्या दुकानातून पाण्याचे फुगे विकत घ्यायचे असल्याचे सांगून घरातून निघाली होती. एक तास उलटून गेला पीडित मुलगी घरी परतली नाही त्यामुळे पालकांनी परिसरात तीचा शोध घेतला परंतु ती तेव्हा ही सापडली नाही. परिसरात पीडित मुली संदर्भात विचारणा केली तेव्हा एकाने सांगितले की, मुलगी एका ऑटोरिक्षातून गेली तीच्या सोबत तीन महिला होत्या.खूशबू नावाच्या एका महिलासोबत मुलगी दिसली होती.
या घटनेनंतर पालकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पालकांच्या सांगण्यावरून भांडूप पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी महिलांचा शोध सुरु केला. अपार्टमेट येथील सर्व सीसीटीव्ही तपासणी केली. खुशी (19) असं आरोपीचे नाव आहे. आरोपी महिलेचा नंबर ट्रॅस करण्यात आले. लगेच ती स्पॉट झाली. पोलिसांनी तीला ताब्यात घेतले, पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तीने अन्य साथीदारांची नावे सांगितली.
पीडित मुलीला एक चॉकलेट दिले होते. पीडित मुलीची आरोपी सोबत ओळख होती त्यामुळे ती पुढे जाण्यास तयार झाली. आरोपी पीडित मुलीला दिव्या कैलाश सिंग आणि पायल शहा या ठाण्यातील बाळकुम पाडा येथील रहिवासी यांना विकण्यासाठी घेऊन जाणार होती.