Aaditya Thackeray (Photo Credit: ANI/Twitter)

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रविवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर बंडखोर शिवसेना आमदारांनी (Rebel Shiv Sena MLAs) जवळच्या आलिशान हॉटेलमधून विधानभवनाच्या आवारात प्रवेश करताना केलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेवरून निशाणा साधला.  26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अजमल कसाब यालाही अशी सुरक्षा नव्हती, अशी टिप्पणी केली. आम्ही मुंबईत अशी सुरक्षा यापूर्वी पाहिली नव्हती. तुम्ही का घाबरताय? कोणी पळून जाणार आहे का? एवढी भीती कशाला, शिंदे गटाचे आमदार विशेष बसमधून विधानभवनात पोहोचताच ठाकरे म्हणाले.

चार दिवस जुन्या शिवसेना- भाजप सरकारची 4 जुलै रोजी विधानसभा अधिवेशनात फ्लोर टेस्ट होणार आहे. शिंदे यांना पाठिंबा देणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी संध्याकाळी गोव्यातून मुंबईत परतले आणि त्यांना दक्षिण मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आले, जेथे फ्लोर टेस्टचे ठिकाण विधानभवन आहे. हेही वाचा Sharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म्हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय

शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांसह शिंदे यांना पाठिंबा देणारे तब्बल 50 आमदार शनिवारी संध्याकाळी चार्टर्ड विमानाने गोव्याहून मुंबईला रवाना झाले. सकाळी गोव्याला रवाना झालेले शिंदे त्यांच्यासोबत परतले. शिंदे यांना 288 सदस्यांच्या सभागृहात लहान पक्षांचे 10 आमदार आणि अपक्ष आणि भाजपच्या 106 आमदारांचाही पाठिंबा आहे.