करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना आंबाजोगाई (Ambajogai Court) कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. तसेच, त्यांच्या वाहन चालकाला एक दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि वाहनात पिस्तूल आढळल्याप्रकरणी न्यायलयाने हे आदेश दिले. करुना शर्मा यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केले होते. या वेळी दोन्ही बाजूच्या विकलांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी (Karuna Sharma In Judicial Custody) सुनावली.
दरम्यान, करुना शर्मा यांनी जामीनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. करुणा शर्मा यांनी याचिकेत म्हटले आहे की, आपण पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करु. त्यामुळे अपणास जामीन देण्यात यावा. (हेही वाचा, Dhananjay Munde Allegation Case Update: धनंजय मुंडे यांना दिलासा, तक्रारदार महिलेकडून तक्रार मागे; भाजपकडून महिलेच्या चौकशीची मागणी)
काय आहे प्रकरण?
करुना शर्मा या परळी येथे दाखल झाल्या होत्या. या वेळी त्यांच्या वाहनात पिस्तूल आढळून आले होते. या प्रकरणी करुना शर्मा आणि त्यांच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, करुना शर्मा यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॅसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात त्यांना आंबाजोगाई कोर्टात हजर करण्यात आले.
दरम्यान, करुणा शर्मा यांच्या वाहनात अज्ञात व्यक्तीने पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियात या व्हिडिओवर उलटसुलट चर्चा होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, करुना शर्मा यांचे वाहन बाजारात येताच त्यांच्या वाहनाबाहेर मोठी गर्दी जमते. या गर्दीतून एक पिवळी ओढणी परिधान केलेली एक महिला करुणा शर्मा यांच्या वाहनाची डिक्की उघडून त्यात काहीतरी ठेवताना दिसते. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.