रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जंयती. बहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देखील त्यांनी दिला त्यांच्या जयंती दिनी राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्ट -
बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष, 'रयत' शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी #कर्मवीर #भाऊराव_पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.#कर्मवीर_भाऊराव_पाटील pic.twitter.com/HRNap8Pn2T
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 22, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट
Salutations to Karmaveer Bhaurao Patil on his Birth Anniversary, whose relentless efforts opened the door of modern education to all.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, आपल्या भगीरथ प्रयत्नांनी सर्वसामान्यांना आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी… pic.twitter.com/mwF20wPPCG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 22, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पोस्ट -
बहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव… pic.twitter.com/98cNKRJGvv
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 22, 2023
मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची पोस्ट -
बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट शिक्षणाच्या प्रसाराद्वारेच साध्य होऊ शकते, हे ओळखून पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबनाची मूल्ये… pic.twitter.com/zcdKm2MzQ9
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 22, 2023
रोहित आर आर पाटील यांची पोस्ट -
बहुजनांचे उद्धारक, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांच्या पोरांसाठी शिक्षणाची दारं उघडणारे,
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणाचे महामेरू,पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
🙏🙏#कर्मवीर pic.twitter.com/mxbsDkiwUN
— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) September 22, 2023
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.