Industry | Photo Credits: Pixabay

मुंबई सह भारतामध्ये 24 मार्चपासून कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आता हा लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात जाणार हे अटळ आहे. पण या कोरोना व्हायरस भोवती अडकून राहून सारे व्यवहार ठप्प करणं अर्थव्यवस्थेसाठी मोठं धोकादायक आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये असणार्‍या काही उद्योगांना आता सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारखी शहरं सोडली. पण त्याचा फटका बसून नये म्हणून आता महाराष्ट्रात राज्य सरकारने 'कामगार ब्युरो' सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे भूमिपुत्रांना नोकरीची मोठी संधी खुली होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या 8 दिवसांमध्ये नोंदणी सुरू होईल अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सुरू होणारी कामगार ब्युरो ही अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरवणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. असा विश्वासही सुभाष देसाईंनी व्यक्त केला आहे. राज्यातील कामगारांची कुशल, अंशत: कुशल आणि पूर्ण कुशल कामगारांची नोंदणी उद्योगांच्या गरजेप्रमाणे कामगार पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. दरम्यान राज्याच्या कामगार विभाग, उद्योग विभाग, कौशल्य विकास विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून हीनोंदणी केली जाणार आहे. Coronavirus Lockdown दरम्यान महाराष्ट्रातील 25,000 कंपन्या सुरु; 6 लाख लोक पुन्हा कामावर रुजू, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती.

महाराष्ट्रात 'कामगार ब्युरो' ची स्थापना'

सरकारने सुमारे 65,000 उद्योगांना त्यांचे कामकाज सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 25,000 कंपन्या सुरु झाल्या असून 6 लाखापेक्षा अधिक कामगार पुन्हा कामावर रुजू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.