येत्या 20 तारखेला राज्यात निवडणूकीचा 5 (Lok Sabha Election 2024) वा टप्पा पार पडणार आहे. पण यापुर्वीच मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कल्याणमध्ये मतदानाच्या 5 दिवसांअगोदर शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. सभेला मान मिळाला नाही, म्हणून कल्याण मुरबाडच्या जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता कल्याणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत शिंदे गटाचे कल्याण मुरबाडचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे (Lok Sabha Election 2024) यांना स्टेजवर स्थान मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच नाराजीतून मोरेंनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा -  Mumbai Metro Service Update: मुंबई मध्ये आज संध्याकाळी 6 नंतर Jagruti Nagar ते Ghatkopar Metro Stations दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सेवा राहणार बंद)

पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुखाचे मानअपमानाचं नाट्य सुरू असल्याचं कल्याणमध्ये दिसत आहे. शिवसेना शिंदे गटात राजीनामा नाट्य सध्या सुरू आहे. जिल्हाप्रमुखाला स्टेजवर मान न मिळाल्यामुळे नाराजीचा सुर उमटत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आणि राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर निमंत्रण नसल्याने शहरप्रमुख पदाचा राजीनामा स्वीकारण्याची मुख्यमंत्र्यांना केली पत्राद्वारे विनंती केली.

कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.  या सभेसाठी व्यासपीठांवर निमंत्रीत पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुखांना निमंत्रण नाही. आमदार, शहरप्रमुख, आमदार हे व्यासपीठावर निमंत्रीत असताना शिवसेना पदाच्या प्रोटोकॉलप्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखाला व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता.