Kalyan News: जीव गेला पण रोखलच! मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याची कोब्राशी झुंज; कल्याणमधील घटना
Photo Credit - Pixabay

Kalyan News: बदलत्या हवामानाचा जसा मानव जातीवर परिणाम होतो, तसाच परिणाम आता प्रण्यांवरही होताना पहायला मिळत आहे. कारण, अशीच एक ताजी घटना कल्याणमधून समोर आली आहे. अजून उन्हाळा सरू झाला नाही. तोच अनेक विषारी आणि बिनविषारी प्राणी थंड जागेच्या शोधतात शहरात दाखल होत आहेत. एक विषारी कोब्रा नाग (cobra snake) कल्याणमध्ये एका घरात आढळला. कोब्रा नागापासून घरातील इतर सदस्यांचा बाचव करण्याच्या लढाईत मात्र, पाळीव कुत्र्याला जीव गमवावा  (cobra-dog fight) लागला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षी उष्णता उच्चांकाचा नवीन टप्पा गाठत आहे. गरमीमुळे अनेकवेळा साप सरळ मानवी वस्तीत शिरतात. यासंदर्भातील घटनांमध्ये गेल्या ३ ते ४ वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (हेही वाचा:Cobra Eating Cobra Video: दुर्मिळ घटनेचा व्हिडिओ व्हायरल, कोब्रानेच गिळला कोब्रा (Watch video))

कोब्रा हा आशिया खंडात आढळणारा सर्वात विषारी नाग आहे. हा नाग ओफिओफॅगस वंशाचा एकमेव सदस्य आहे. जगातील सर्वात लांब विषारी नाग आहे. कल्याणमध्ये हायप्रोफाईल भागातील एका बंगाल्यामध्ये विषारी कोब्रा नाग घुसला. घरात कोब्रा आल्याची चाहूल लगताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला. त्याने आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेले संकट ओळखले आणि ते स्वत:वर ओढवून घेतले. त्यानंतर कोब्रा आणि कुत्र्याची झुंज सुरु झाली. घरातील सद्स्यांना याची माहिती होताच, त्यांनी सर्पमित्राशी संपर्क केला. या झुंजीत कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्पमित्राने नागाला पकडून जंगलात सोडले. (हेही वाचा:King Cobra Video: अरे बापरे! उशीखाली लपला किंग कोब्रा, घटा कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडिओ)

कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हिल या हायफ्रोफाईल परिसरात मॅथ्यूज यांचा बंगला आहे. या बंगल्यात मॅथ्यूज यांच्या कुटुंबासह डॉबरमन जातीचा पाळीव कुत्रा गेल्या दोन वर्षांपासून राहत आहे. या कुत्र्याचे मॅथ्यूज कुटुंब आपल्या घरातील एक सदस्य असल्यासारखे त्याचे पालन-पोषण करायचे. शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मॅथ्यूज यांच्या बंगल्यात चार फुटाचा कोब्रा नाग शिरला होता. नागाला पाहून कुत्रा आक्रमक झाला. त्याने कोब्र्याला बंगल्यात येण्यास जोरदार प्रतिबंध केला. दोघांची झुंज झाली. मात्र कुत्रा बांधलेला होता. कुत्र्याच्या आवाजामुळे कुटुंब धावत त्याच्याजवळ आले. कुत्रा आणि नागाची झुंज पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. परंतु कुत्रा बांधलेला असल्यामुळे त्याला मर्यादा आला. या लढाईत विषारी असलेल्या कोब्राने नागाने कुत्र्याला दंश केला. नागाचे विष शरीरात भिनल्यानंतर कुत्र्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

मॅथ्यूज यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला होता. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी बंगल्यात फणा काढून बसलेल्या कोब्र्याला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. नाग पडकल्याचे पाहून बंगल्यातील मॅथ्यूज कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.