कल्याण न्यायालयाकडून 34 वर्षीय महिलेची स्वतःच्याच नवजात मुलीच्या हत्या केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
Court Hammer | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

ठाणे जिल्ह्यातील कोर्टाने 34 वर्षीय महिलेला आपल्या नवजात बाळाच्या जीव घेतल्याच्या प्रकरणामधून सुटका दिली आहे. benefit of doubt देत या प्रकरणातून तिची सुटका करण्यात आली आहे. तपासामध्ये या महिलेविरूद्ध गुन्हा सिद्ध होऊ न शकल्याने तिची सुटका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये इंडियन पिनल कोड 302 अर्थात हत्येचा गुन्हा दाखल होता. Additional Public Prosecutor S R Kulkarni यांनी कोर्टात दिलेला माहितीनुसार, महिलेला आधीच दोन मुली होत्या. त्यानंतर 15 एप्रिल 2018 ला तिने अजून एका मुलीला जन्म दिला. 17 एप्रिलला तिची हॉस्पिटल मधून सुटका झाली.

21 एप्रिलला ही महिला कल्याण मधील उंबरडे गावामध्ये सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बाळाला आपल्या पतीसोबत घेऊन गेली. तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला मृत अवस्थेत आणल्याचं सांगण्यात आले. दरम्यान पोलिसांना संशय आहे की या बाळाला आईनेच मारलं आहे. महिलेने सलग तिसर्‍या मुलीला जन्म दिल्याने तिचा जीव पालकांनीच घेतल्याचं सांगत कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायामूर्तींनी त्यांच्या ऑर्डर मध्ये दिलेल्या माहिती मध्ये बाळाच्या गळ्याजवळ, मानेजवळ कोणत्याही खूणा आढळलेल्या नाहीत. असे नमूद केले आहे. स्पष्टपणे, जेव्हा त्यांनी मुलाला रुग्णालयात आणले तेव्हा आरोपी आणि तिचा पती मृतकासोबत होते. त्यामुळे मयताच्या हत्येबाबत संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीने मुलाचे तोंड आणि मान दाबली, हे सिद्ध करणारा कोणीही साक्षीदार नाही. गुन्हा आणि आरोपी यांच्यातील संबंध प्रस्थापित करणारी कोणतीही साखळी देखील नसल्याचे न्यायाधीश म्हणाले आहेत.

आरोपींचा गुन्ह्याशी संबंध जोडण्यासाठी फिर्यादीने रेकॉर्डवर आणलेले तोंडी किंवा कागदोपत्री पुरावे नाहीत, असे म्हटले आहे. फिर्यादीने मयत व्यक्तीचा मृत्यू हा homicidal death झाल्याचे सिद्ध केले असले तरी, फिर्यादी पक्षाने आरोपीचा गुन्ह्याशी संबंध जोडलेला नाही. त्यामुळे पुराव्याअभावी आरोपीने मृताचा खून केल्याचे सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरले, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या महिलेची निर्दोष मुक्तता करणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.