कल्याण: आंबिवली येथील रेल्वे स्थानकाजवळील बोगदा धोकादायक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कल्याण (Kalyan) नजीकच्या आंबिवली (Ambivali) येथील रेल्वे स्थानकाजवळील बोगदा धोकादायक बनला असल्याचे समोर आले आहे. या मार्गावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या वारंवार प्रवास करत असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बोगद्याचे काम करण्यात यावे अशी मागणी मध्य रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

आंबिवली-टिटवाळा रेल्वे मार्गावर बोगदा अत्यंत बिकट परिस्थितीचा झाला असून त्याचे लोखंडी रॉड स्पष्टपणे दिसून येत आहेत. तर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस जात असल्याने बोगद्यामधून जाताना आवाजाने कंपने होतात. यामुळे प्लास्टर नागरिकांच्या अंगावर पडल्याच्या घडना घडल्या आहेत.(कोपर- दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू)

हा बोगदा 50 वर्ष जुना अस्याने आंबिवलीच्या पश्चिम- पूर्वेकडून जाण्यासाठी या बोगद्याचा वापर केला जातो. परंतु याची पाहणी करुन तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.