
Kalyan Accident: कल्याण पूर्वेला भरधाव मिक्सर ट्रकचे अचानक ब्रेक खराब झाल्याने मोठा अपघात झाला आहे.कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मिक्सर ट्रक बुडलिंक रोडवरून चक्की नाक्याच्या दिशेने जात होता. दरम्यान, ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकच्या धडकेत चार रिक्षा आणि एक छोटा टेम्पोला जबर धडक बसली. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवर @navarashtra नावाच्या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो आणि रिक्षा अक्षरशः चुरा झाले होते.
कल्याणमध्ये अपघात
KALYAN : कल्याण पूर्व पुणे लिंक रोड वरील धक्कादायक घटना, घटना सीसीटीव्हीत कैद #kalyan #marathinews #News #kalyaneast pic.twitter.com/1tgSCrBlpf
— Navarashtra (@navarashtra) March 8, 2025
टेम्पोमध्येच अडकला होता टेम्पोचालक
टेम्पोचालक टेम्पोमध्येच अडकला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर टेम्पोचालकाला रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन रिक्षाचालक आणि दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.