प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

कल्याण खाडीतील पाणी बैल बाजारात शिरल्याने तेथे असलेल्या शंभर म्हशींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ठाण्यात ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर उल्हास, वाळदुहानी आणि कामवरी या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली गेली त्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बैल बाजाराचे मालक यांनी सकाळी 6 वाजता कल्याण खाडीतील पाण्याची पातळी वाढत असल्याचेपाहिले असता त्यांनी म्हशींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आणि पुलाच्या येथे त्यांना हलविले.

2019 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीची पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सुद्धा म्हशींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. या व्यतिरिक्त 2016 रोजी ही पुरामुळे अनेक म्हशींचा मृत्यू झाला होता.(Ratnagiri flood: रत्नागिरी जिल्ह्यातील पूराबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती)

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथे पिण्याच्या पाण्यावर परिणाम झाला आहे. तर उल्हासनगर येथील नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, पंपिंग स्टेशनात पाणी शिरल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. केडीएमसीटच्या पब्लिक रिलेशन ऑफिसर माधवी पोफळे यांनी असे म्हटले की, नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने कल्याण-डोंबिवली मध्ये पिण्यावर परिणाम झाला आहे. अशीच परिस्थिती उल्हासनगर आणि बदलापूर येथे सुद्धा निर्माण झाली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या बैठकीत आढावा घेतला आहे. पाऊस सुरूच असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांसह इतर संबंधित विभागांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे. तसेच नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.