आलोक आराधे | X @PTI

आलोक आराधे (Alok Aradhe  यांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नेमणूक झाली आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज (21 जानेवारी) त्यांना न्यायमूर्ती पदाची शपथ दिली आहे. राजभवनात हा कार्यक्रम पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली झाल्यानंतर न्या.आलोक आराधे यांची नेमणूक झाली आहे. ते यापूर्वी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते.

आलोक अराधे मूळचे छत्तीसगडचे आहेत. 13 एप्रिल 1964 रोजी रायपूर मध्ये त्यांचा जन्म झाला आहे. 1988 रोजी वकील म्हणून नोंदणी झाल्यानंतर एप्रिल 2007 मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाले. यापूर्वी त्यांनी जम्मू कश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश मध्येही न्यायमूर्ती पदाची जबाबदारी निभावली आहे.

आता आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून शपथबद्ध झाले आहेत. 13 जानेवारीला केंद्र सरकारने त्यांच्या नेमणूकीची माहिती दिली होती.