Jitendra Awhad Threat : जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या रडारवर, लाखोंची मागणी; पैसे न दिल्यास सलमान खानसारखं प्रकरण करू धमकी
Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

Jitendra Awhad Threat : बॉलीवूड अभिनेता सलामान खान याच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँग (Bishnoi Gang)कडून धमकी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास सलमान खान सारखे होणार असल्याचे म्हटले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा म्हटले आहे. थेट ऑस्ट्रेलियातून हा फोन आल्याचे समजते आहे. त्यामुळे सलमान खाननंतर आमदार जितेंद्र आव्हाड या गँगच्या रडारवर आले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.(हेही वाचा :Death Threat to Eknath Khadse: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी; दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आले फोन )

पंजाबी गायक सिधू मूस वाला याची हत्या या गँगने केली होती. लॉरेंस बिश्नोई हा पंजाबमधील गँगस्टर आहे. त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहे. सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर या गँगमधील दोघांना मागील आठवड्यात पोलिसांनी अटक केली.

गुजरातमधून विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यामुळे ही गँग आता महाराष्ट्रात सक्रीय होऊ लागल्याची चिन्ह आहेत. दरम्यान या झमकीचा फोन येताच जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.