Death Threat to Eknath Khadse: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी; दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आले फोन
Eknath Khadse (File Image)

DeathThreat to Eknath Khadse :  एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या दरम्यानच, एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat ) आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम हे तुम्हाला जीवे मारण्याच्या तयारीत आहेत, असे त्यांना फोनवर सागंण्यात आले. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (हेही वाचा :Eknath Khadse Joins BJP: एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार, भाजप प्रवेश झाला निश्चित )

खडसे यांना धमकीचे फोन येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांना धमकीचे फोन आले आहेत. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत tv9 मराठीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, 'छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. पहिल्या फोनवेळी खडसे यांनी हे प्रकरण गंभीर्याने घेतले नाही. त्यानंतर दुसऱ्या फोन नंबरवरुन पुन्हा फोन आला. त्यावेळी की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत, असे सांगण्यात आले. तब्बल चार ते पाच वेळा असे फोन आले', त्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एकनाथ खडसे यांनी पुन्हा धमकी, पोलिसांत तक्रार दाखलhttps://t.co/dH3rFjyh6a#EknathKhadse #CrimeNews

— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2024