हर हर महादेव सिनेमाच्या वादातून काल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. काही वेळातचं आव्हाडांना या प्रकरणी जामीन मंजूर झाला पण गेले काही दिवसानंतर या वादावरुन राज्याच्या राजकारणात चांगलचं वातावरण तापलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी विरुध्द मनसे असा सामना बघायला मिळाला. किंबहुना राष्ट्रवादीकडून राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली होती. तर आज जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातील दोन पुलांचं लोकार्पण होणार आहे. तसेच कळवा पुलाच्या एका मार्गिका मुंब्रा वाय जंक्शन इथं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाचे सर्वपक्षिय आमदार आणि खासदारांना निमंत्रण देण्यात आले. यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नावाचा सामावेश आहे. तरी कार्यक्रम दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि देवेद्र फडणवीस एकाचवेळी  एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

 

ठाणे मुंब्रात होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कशी फटकेबाजी रंगणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. हर हर महादेव सिनेमाच्या वादानंत सध्या शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षाचे पडसाद कळव्यातील कार्यक्रमात उमटण्याची शक्यता आहे. कालचं जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली होती. कोणीही अशाप्रकारे कायदा हातात घेतला असता तर त्याच्यावर हीच कारवाई झाली असती. पण जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आपण खूप काही मोठं केलंय, हे दाखवण्याच्या नादातून सगळ्या गोष्टी घडल्या, असे देवेंद्र फडणवीसांनी मत व्यक्त केलं आहे. (हे ही वाचा:- Deepali Sayyad आज करणार शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश)

 

जितेंद्र आव्हाड यांनी काल कोर्टामध्ये नातेवाईंकांशी बोलताना नवीन खुलासा केला होता. 'चाणक्याचे सतत पोलिसांना फोन येत आहे. फोनवरुन पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. जेवण पण मिळू नये करता प्रयत्न केले जात होते, असा आरोप आव्हाड यांनी केला होता. तरी आज दोन्ही नेते एकाचं मंचावर म्हटल्यावर चर्चा तर होणारचं.