मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे परस्परांच्या संपर्कात आहेत, असा आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून तातडीने खुलासा कण्यात आला आणि या चर्चा आणि वत्तांचे खंडण करण्यात आले. जरांगे पाटील आणि पवारसाहेब यांच्यात कोणताही संपर्क, संबंध नाही. दोन्ही नेते परस्परांना कधीही भेटले नाहीत. त्या उलट जरांगे यांच्या संपर्कात कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असा माझा अंदाज आहे, असे जंयत पाटील यांनी म्हटले. किर्तनकार अजय बारसकर (Ajay Baraskar) आणि संगिता वानखेडे यांनी शरद पवार यांचे नाव घेत जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते.
जयंत पाटील यांची सरकारला सूचना
मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात होणारा विसंवाद नेमका कशामुळे होतो आहे याकडे राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. तसेच, चर्चेतून तोडगा कढून एकाच मागणीसाठी आंदोलने वारंवार होऊ नयेत यासाठी सरकारचे प्रयत्न आवश्यक असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. (हेही वाचा, Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकला, मनोज जरांगे पाटील यांची मागणी)
मनोज जरांगे पाटील यांच्यावर जुन्या सहकाऱ्यांकडून आरोप
मनोज जरांगे पाटील जुने सहकारी आणि किर्तनकार अजय बारसकर (Ajay Baraskar) आणि संगीता वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या वेगवेगळ्या संवादात जरांगे पाटील आणि शरद पवार हे एकमेकांच्या संपर्कात आहेत. शरद पवार यांनीच मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यास आणि मोर्चे काढण्यास आर्थिक पाठबळ पुरवले. मराठा आरक्षण आंदोलनात खर्च होणारा सर्व पैसा पवार यांचाच होता, असाही आरोप वानखेडे यांनी केला. मात्र, या आरोपाची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे त्यांनी आपल्या वक्तव्यादरम्यान दिले नाहीत. मनोज जरांगे पाटील हे फसवे आहेत. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. ते सातत्याने आपली भूमिका बदलतात. उपोषणाच्या नावाकाली ते मराठा समाजालाही वेठीस धरतात, असाही गंभीर आरोप त्यांनी केला. (हेही वाचा, Manoj Jarange Patil on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, '10% मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केली')
अजय बारसकर यांचे गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील हे कॅमेऱ्यासमोर वेगळी भूमिका आणि गुप्त बैठकांमध्ये वेगळी भूमिका घेत असतात. ते सातत्याने बदलत असतात. त्यांची भाषा अर्वाच्च आणि शिवीगाळ करणारी असते. मुंबई मोर्चावेली शेवटच्या दोन गुप्ट बैठका झाल्या. या बैठकांमध्ये नेमकं काय झालं हे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट करावे. त्यांची भूमिका केव्हाही पारदर्शी नसते. ते केवळ हेकेखोरपणा करतात. दररोज ते पलटी मारत असतात, असा गंभीर आरोप अजय बारसकर यांनी केला. (हेही वाचा, Legal Challenge Over Maratha Reservation: मराठा आरक्षणाला कायदेशीर आव्हान; महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियुक्त्यांविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल)
जरांगे पाटील यांचे प्रत्युत्तर
दरम्यान, बारसकर यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, अशा आरोपांना आपण उत्तर देत नसतो. या पुढे आपण त्यावर बोलणार नाही. मराठा समाजाला आरक्षण हे आपले ध्येय आहे. त्यासाठी आपण समाजाशी बेईमानी करणार नाही. समाजाला आरक्षण मिळू द्या, अशा लोकांना एका रट्ट्यात सरळ करतो, असा इसाराही त्यांनी या वेळी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे समाज आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशाही स्पष्ट केली. याच वेळी त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या 10% आरक्षणावर आपण समाधानी नसून आंदोलनावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.