Photo Credit- X

Jayakwadi Dam Water Level Increase: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी जायकवाडी धरणाच्या(Jayakwadi Dam) पाणीपातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा आता 14 टक्क्यांवर पोहचला आहे. काल झालेल्या पाण्याच्या विसर्गाआधी जायकवाडीचा पाणीसाठी 4 टक्क्यांपर्यंत घसरला होता. (हेही वाचा:Ujani Dam Overflow: सोलापूरचे उजनी धरण भरले, 40 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका )

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय.पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. परिणामी नाशिकमध्ये पाऊस असचा सुरू राहिला तर, जायकवाडीच्या पाणीसाठ्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखेड, निळवंडे, गंगापूर, ओझरवेर, दारणा, भावली कडवा, नागमठाण, नांदूर मध्यमेश्वर, भंडारदरा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. (हेही वाचा:Middle Vaitarna Reservoir Overflowing: मुंबईला पाणीपुरवठा करणारे मध्य वैतरणा जलाशय' ओसंडून वाहण्यास सुरूवात)

त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये सध्या पाण्याचे आवक वाढली आहे. सध्या जायकवाडी धरणात जवळपास 20 हजार क्युसेक्स आवक सुरू आहे. सध्याचा जायकवाडी धरणातील पाणीसाठा पाहता पुढील 8 महिने पिण्यासाठी आणि उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे.

नाशिक शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे काल रविवारी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. परिणामी, गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी दुपारी 12 वाजता धरणातून 500 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दुपारी 3 वाजता 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.