कुख्यात गुंड एजाज लकडावाला याचा साथीदार सलीम महाराज  याला काही वेळापूर्वी मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात सलीम यांचे नाव देखील गुंतले असल्याने ही कारवाई करण्यात आली. 

DHFL चे सीईओ कपिल वाधवा यांना ED ने अटक केली आहे. इक्बाल मिर्ची मनी लाँडरिंग प्रकरणी  बेकायदा निधी जमवल्याचा आरोप कपिल वाधवा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वाधवा यांची रवानगी ईडीच्या कोठडीत करावी जेणेकरुन त्यांची याप्रकरणी चौकशी करता येईल अशी विनंती विशेष न्यायालयाला करण्यात आली आहे.

मुंबई, उत्तर कोकण व गोव्यात एक ते दोन ठिकाणी मेघ गर्जनेसह हल्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत उद्या आकाश ढगाळ राहील असा अंदाज स्कायमेट तर्फे वर्तवण्यात आला आहे.

एल्गार परिषदेप्रकरणी विशेष तपासासाठी कारवाईला वेग आला आता. आता कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी NIA टीम पुणे आयुक्तालयात दाखल झाली आहे. 

लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण व खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सातारा सत्र न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. 

निर्भया बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या (28 जानेवारी) दिवशी 12.30 वाजता तीन न्यायाधीशांचे खंडपीठ महत्त्वपूर्ण सुनावणी करणार आहे. मुकेश  या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींनी राष्ट्रापतींनी फेटाळलेल्या दया याचिकेला न्यायालयात आव्हान दिले आहे. 

मुंबई पुलिसांच्या एंटी एक्सटॉर्शन सेलद्वारा अटकेत असलेली शिफा शेखचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे.  शिफा ला  मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट वरून अटक करण्यात आली होती.

पंकजा मुंडे यांनी आज उपोषणादरम्यान मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मांडल्या. तसेच त्या यापुढे समाजसेविका म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. परंतु, "मी पक्ष सोडणार या अफवांवर विश्वास ठेवू नका," असं म्हणत त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल काय असेल हे देखील स्पष्ट केले आहे. 

पंकजा मुंडे यांनी आज ओरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. मात्र जनतेशी संवाद साधताना त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेच्या कामांसाठी लढा देणार असल्याचे सांगितले. तसेच भाजपने उपोषणाला पाठिंबा दिल्याने पक्षातील सर्व नेत्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. त्या यापुढे समाजसेवक म्हणूनच काम करणार असल्याचंही त्यांनी सांगीतलं.

जिहाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतला तसेच मागच्या सरकारच्या कामांचा आढावा घेतला. मागच्या सरकारने काही विभागांना कमी-जास्त निधी दिला होता. मात्र आता सर्व विभागांना देण्यात येणाऱ्या निधीचं योग्य वाटप करण्यात येईल.

Load More

भाजपच्या नेत्या व महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री महाराष्ट्र पंकजा मुंडे या आज औरंगाबादमध्ये उपोषण करणार आहेत. मराठवाड्यातील लोकांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी हे उपोषण असणार आहे. हे लाक्षणिक उपोषण मराठवाड्यातील जनतेला त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी असून सकाळी दहा वाजता ओरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत जमणार आहेत. विशेष म्हणजे या उपोषणात पंकजा मुंडे यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे असे भाजपचे बडे नेते सहभागी होणार आहेत.

तर दुसरीकडे महाविकासआघाडी सरकारने अखेर त्यांची महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी उद्घाटन केले. काल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये तर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या योजनेचे उद्घाटन केले. त्यांच्यासोबतच महाराष्ट्राचे पालकमंत्री बच्चू कडु यांनी अकोल्यामध्ये शिवथाळीचे लोकार्पण केले आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

आंतरराष्ट्रीयस्तरावर मात्र अद्यापही इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अजून कमी झालेला पाहायला मिळत नाहीय. रविवारी राष्ट्रे, इराकचा राजधानी बगदाद येथे अमेरिकन दूतावासाजवळ पाच रॉकेटने हल्ला करण्यात आला. परंतु, या हल्ल्याची जबाबदारी अद्यापतरी कोणीच स्वीकारलेली नसून या एका महिन्यातील हा अमेरिकन दूतावासाजवळ झालेला चौथा हल्ला आहे.