मुंबई: कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास; 17 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्र
Siddhi Shinde
|
Jan 17, 2020 09:56 PM IST
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर आपले टीकास्त्र सोडून शिवछत्रपतींचे वारस असल्याचा पुरावा घेऊन या असे विधान केले होते, ज्यांनंतर उदयनराजेंच्या समर्थकांकडून सातारा बंद करण्यात आला होता तर आज सांगली (Sangali) मध्ये सुद्धा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान (Shiv Pratishthan) तर्फे बंदाची हाक देण्यात आली आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा सांगली दौरा देखील नियोजित आहे.
संभाजी भिडे यांनी संजय राऊत यांना पदावरुन हटवावे, अन्यथा हे बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यावर मुख्यमंत्र्यांचे मत अजूनही समोर आलेले नाही.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दुसरीकडे, मुंबईत आज थंडीने मागील कित्येक वर्षातील रेकॉर्ड मोडून काढत तब्बल 11. 4 अंशावर घसरण केली आहे. अशातच उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस तापमानाचा पारा कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. सांताक्रूझ येथे आज सकाळी 11.4 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथील तापमान 14.5 अंश होते. गेल्या दहा वर्षांत 2013 या दोन वर्षांत इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. तर नाशिक, निफाड येथे तापमान घसरून 2.4 अंशावर उतरले आहे. समान परिस्थिती राज्यभरात पाहायला मिळत आहे.