Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपूर (Nagpur) शहरात दोन दिवसांचा 'जनता कर्फ्यू' (Janta Curfew) लागू करण्यात येणार आहे. 25 आणि 26 जुलै हे दोन दिवस नागपूरात जनता कर्फ्यू असेल. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. अशी माहिती नागपुरचे पालिका आयुक्त (Nagpur Municipal Commissioner) तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी दिली. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांपाठोपाठ नागपूरातही कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. सध्या नागपूरात 2022 कोरोना बाधित रुग्ण असून 1366 रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शहरातील रुग्णसंख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे.

काल तुकाराम मुंढे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी शहरात 2 हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण असल्याने कोणीही गाफील राहू नये. मृत्यूदर वाढला असून 1.56% इतका झाला आहे. तसंच नियम पाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पुढील महिन्यात येणारे सण सार्वजनिकरीत्या साजरे करु नये असे आवाहन त्यांनी केले आहे. (COVID-19 Pandemic मध्ये गर्भवती आणि आजारी असणाऱ्या महिलांना ऑफिसला न येण्याची मुभा- महाराष्ट्र सरकार)

ANI Tweet:

तुकाराम मुंढे फेसबुक लाईव्ह:

यापूर्वी कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे ही शहरं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आली होती. दरम्यान पुण्यातील लॉकडाऊनचा कालावधी संपला असला तरी निर्बंध कायम राहणार आहेत. तर ठाणे, नवी मुंबई या शहरांच्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन असणार आहे.