ATS Chief Vineet Agarwal | (Photo Credit: Twitter/ANI)

जान मोहम्मद अली मोहम्मद शेख (Jan Mohammad Sheikh) याला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आणि इकडे महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ उडाला. या जान याला दिल्ली पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. त्यावर राज्य सरकारवर टीका करता “एटीएस झोपली होती का?” असा सवाल उपस्थित केला. या टीकेला महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS ) मुंबई (Mumbai) येथे पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. एटीएसचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याच्यावर मुंबई एटीएसचे बारीक लक्ष होते. पाठिमागील 20 वर्षांपासून त्याचे दाऊद गँगशी संबंध होते. तसेच, तो कर्जाच्या खाईत होता. त्याला पैशांची गरज होती, असेही मुंबई एटीएसने म्हटले आहे.

एटीएसचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी काही आरोपांखाली एकूण 6 जणांना अटक केली. त्यापैकी एक असलेला जान मोहम्मद अली मोहम्मद शेख हा मुंबई येथील धारावी परिसरातील राहणार आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याचे गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध आहेत.

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

ज्या प्रकरणात अटक झाली त्याची माहिती आमच्याकडे नव्हती. केंद्रीय यंत्रणांनी ती दिल्ली पोलिसांना दिली होती. त्याने 9 तारखेला दिल्लीला जायचे नियोजन केले. 10 तारखेला त्याने पैसेही ट्रान्स्फर केले. मात्र, त्याचे तिकीट निश्चित होत नव्हतं. त्यामुळे त्याने 13 तारखेस गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनसाठी वेटींग तिकीट घेतलं. तोपर्यंत संध्याकाळी त्याचे तिकीट कन्फर्म झाले. ट्रेनने एकटाच निघालेला तो कोटाला पोहोचला. तेथे त्याला अटक झाल्याचे एटीएसने सांगितले. (हेही वाचा, Nirbhaya Squad: मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'निर्भया पथका'ची स्थापना, महिला सुरक्षतेसाठी उचलले महत्वाचे पाऊल)

एएनआय ट्विट

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक व्यक्ती मुंबईत आला आणि त्याने रेकी केली असं सांगितलं जात आहे. पण, त्यात तथ्य नाही. मुंबईत रेकी झालेली नाही. तो जेव्हा ट्रेनने निघाला होता तेव्हाच त्याला अटक झाली. जान याच्यावर खूप कर्ज होते. त्यातच त्याने कर्जावर एक टेम्पो घेतला. त्याचे हाफ्ते भरले नाहीत म्हणून तो बँकेने ओढून नेला. पुन्हा त्याने एक दुचाकी घेतली. ती दुचाकीही कर्जाचे हप्ते न फिटल्याने बँकेने ओढून नेली. त्याची नोकरीही गेली होती. त्यामुळे तो सतत पैशाच्या शोधात असायचा, असेही एटीएसने सांगितले. दरम्यान, जी कारवाई करायची ती दिल्ली पोलीस आणि आम्ही मिळून करु असेही एटीएसने म्हटले.