Maharashtra and Jharkhand Election Results 2024: महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra and Jharkhand Assembly Elections) भाजप (BJP) ला विजयाची पूर्ण आशा आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात जिलेबी (Jalebis) बनवण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी या निवडणुकांचे एक्झिट पोलचे निकाल भाजपसोबतच्या आघाडीतील पक्षांच्या बाजूने दिसत असले तरी हरियाणातील एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले, हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. एक्झिट पोलच्या अंदाजांच्या आधारे काँग्रेसने हरियाणात मिठाईची व्यवस्था आधीच केली होती, पण नंतर निकाल आल्यावर भाजपने जिलेबीचा आस्वाद घेतला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले, तर 81 जागा असलेल्या झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत निवडणुका झाल्या. दोन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. (हेही वाचा -Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर)
दिल्ली मुख्यालयात जलेबी बनवण्याची तयारी सुरू, पहा व्हिडिओ -
VIDEO | Jalebis being prepared at BJP headquarters in New Delhi, ahead of the counting of votes in Maharashtra and Jharkhand. #MaharashtraElection2024 #JharkhandElection2024 #ElectionResults2024WithPTI pic.twitter.com/RD4kKmB5Xx
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलने संमिश्र अंदाज वर्तवला आहे. पीपल्स पल्स एक्झिट पोलने महायुतीला 175-195 जागा आणि एमव्हीएला 85-112 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तथापि, इलेक्टोरल एज पोलने MVA साठी 150 जागांसह विजयाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला 121 जागा जिंकता येतील असं म्हटलं आहे. लोकशाही रुद्रने दोन गटांमध्ये निकराची लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे.