Mumbai Jaipur Express

जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या (Jaipur-Mumbai Train Firing Case) चौकशीसाठी उच्च स्थरीय समितीची (High Level Committee) स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये 5 सदस्यांचा समावेश असणार आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहेत. तसंच या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. (हेही वाचा - Thane Shahapur accident: शाहापुर दुर्घटनेत मृत मजूरांच्या कुटूंबीयांना केंद्राकडूून आणि राज्याकडून आर्थिक मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार)

जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणाची आता उच्च स्थरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे पी. सी. सिन्हा, अजोय सधन्य, नरसिन्ह आणि मध्य रेल्वेचे जे पी रावत, प्रभात या पाच जणांचा या समितीमध्ये समावेश आहे. या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचसोबत या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या चौघांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. आरपीएफ जवान चेतन सिंहने धावत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यासह प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. दहिसर ते मीरारोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. या गोळीबारामध्ये आरपीएफ पोलिसासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला.