Paramhans Acharya: जगद्गुरु परमहंस आचार्य यांना Taj Mahal मध्ये 'नो एन्ट्री', वाद वाढल्यावर अधिकाऱ्याकडून माफी
Paramhans Acharya | (Photo Credits: Facebook)

अयोध्येतील तपस्वी छावनीचे जगद्गगुरु परमहंसाचार्य (Jagadguru Paramhans Acharya) यांना आगरा (Agra) येथील ताजमहालमध्ये प्रवेश नाकाराण्यात आल्याचा आरोप आहे. परमहंसाचार्य यांनी म्हटले आहे की, केवळ भगवे कपडे घातल्यामुळेच आपणास ताजमहाल (Taj Mahal) येथे प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, सरकारी अधिकाऱ्याचा दावा आहे की, परमहंसाचार्य हे लोखंडी ब्रह्मदंड आत घेऊन निघाले होते. त्यामुळे त्यांना रोखण्यात आले. वाद पुढे अधिक वाढल्यानंतर संबंधीत अधिकाऱ्याने माफी मागितल्याचे वृत्त आहे.

परमहंसाचार्यांचे म्हणने असे की, ते ताजमहाल येथील गुप्त शिवलिंग पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी 5.35 वाजता ते आपल्या शिष्यांसोबत ताजमहालमध्ये प्रवेश करु लागले तेव्हा उपस्थित CISF जवानांनी त्यांना रोखले. त्यांनी त्यांच्या भगवे कपडे आणि लोखंडी ब्रह्मदंडावरुन आक्षेप घेतला. दरम्यान, अधिकाऱ्यासोबत चर्चा सुरु असताना ते तिकीट घेण्यासाठी गेले. त्यांचा शिष्य जेव्हा फोटो काढण्याचा प्रयत्न करु लागला तेव्हा उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्यांचा मोबाईल घेऊन फोटो डिलीट केले. (हेही वाचा, Taj Mahal: पर्यटकांना 21 ऑगस्टपासून चांदण्या रात्रीत पाहता येणार ताजमहल, 'अशी' करा तिकिटांची बुकींग)

परमहंसाचार्यांनी पुढे सांगितले की, अलीगड येथील एक भक्त परिवारातील महिलेची प्रकृती खराब होती. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते अलीगढला आले होते. त्यानंतर ते आपल्या तीन शिष्यांसोबत आगरा येथे पोहोचले. इथे त्यांना ताजमहाल पाहायचा होता. त्यांच्यासोबत सरकारी गनरही सोबत होता. स्मशानघाटाच्या चबुतऱ्यावरुन ते ताजमहाल पाहण्यासाठी निघाले तेव्हा उपस्थित पोलिसकर्मचाऱ्यांनी त्यांना ओळख विचारत कोल्फ कार्टमध्ये बसवून पश्चिमी फाटकापर्यंत पाठवले.

ताजमहालमध्ये परमहंस यांना प्रवेश न दिल्याने हिंदुत्त्वादी मंडळीनी जोरदार विरोध केला. हा विरोध पाहून आगरा येथील एएसआय कार्यालयात अधिक पोलीस बल तैनात करण्यात आले. सकाळी साधारण 11 वाजता हिंदुत्त्ववादी एएसआयच्या विरोधात पुतळा घेऊन पोहोचले. दरम्यान, उपस्थित पोलिसांनी त्यांच्याकडून पुतळा काढून घेतला. हंदू महासभेने याघटनेचा तीव्र निषेध केला आहे.