महाराष्ट्रातून (Maharashtra) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील औंध (Aundh) भागात राहणाऱ्या सुदिप्तो गांगुली नावाच्या आयटी इंजिनिअरने पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाची हत्या (Murder) केली. यानंतर त्याने आत्महत्या (Suicide) केली. अभियंत्याने पत्नी आणि मुलाची पॉलिथिनने गळा आवळून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुदीप्तोने काही महिन्यांपूर्वी आयटीची नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला होता. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील औंध परिसरात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह इमारतीतून बाहेर काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. व्यवसायाने आयटी अभियंता असलेला सुदीप्तो गांगुली हा मूळचा पश्चिम बंगालचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. हेही वाचा Gaganyaan Mission: इस्रो पुन्हा इतिहास रचण्यासाठी तयार, 'या' महिन्यात गगनयान मिशन करणार सुरू
त्याने आधी पत्नी प्रियांका आणि निष्पाप मुलगा तनिष्क गांगुली यांची पॉलिथीनने गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने गळफासही घेतला. त्याच्या नातेवाइकांनी पुण्यातील चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात अभियंता बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. याशिवाय कोणतीही सुसाइड नोट पोलिसांना सापडलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी दिल्लीतही अशीच हृदयद्रावक घटना समोर आली होती. दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेस पोलीस स्टेशन हद्दीतील शकूरपूर परिसरात एका व्यक्तीने आपल्या 4 वर्षाच्या मुलासमोर पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या व्यक्तीला पत्नीच्या अवैध संबंधांवर संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे.