बॉलिवूड अभिनेता इरफान खान याची आज मुंबईमध्ये एका दुर्धर आजाराच्या विरूद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे. कोकिलाबेन रूग्णालयात काल दाखल झालेल्या इरफानने आज शेवटचा श्वास घेतला. दरम्यान त्याच्या निधनाचं वृत्त समजताच राजकारणी, कलाकार मंडळींसोबतच मुंबईच्या डब्बेवाल्यांनीही या कलाकाराला आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचे आणि ईरफान खान याचे नाते खास होते. इरफानच्या ” लंच बाॅक्स “ चित्रपटात अनेक डबेवाल्यांनी त्यांचे सोबत काम केले होते. “ लंच बाॅक्स” चित्रपटाला हिंदी चित्रपट सृष्टीत एक मैलाचा दगड म्हंणुन मान मिळाला होता. या चित्रपटाच्या प्रिमीयर शोला देखील मुंबईच्या डब्बेवाल्यांनी इरफान सोबत हजेरी लावली होती. त्याच्या या विनम्र वागणुकीची आठवण शेअर करत मुंबईच्या डब्बेवाल्यांनी त्याला आपली आदरांजली अर्पण केली आहे.
018 मध्ये इरफान खान याला Neuroendocrine Tumour चे निदान झाले होते. त्यानंतर युके मध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. इरफान खान यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे इंग्रेजी मिडियम या सिनेमाच्या प्रमोशनलाही त्याने हजेरी लावली नव्हती. तेव्हापासून तो सिनेसृष्टीपासून लांबच होता. आज थोड्यावेळापूर्वी शुजित सरकारने इरफानच्या निधनाचं वृत्त्त शेअर केलं.
महाराष्ट्रात मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनीही आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. इरफान खान 53 वर्षीय होता. तीन दिवसांपूर्वीच इरफान खानची 95 वर्षीय आई सईदा बेगम यांचं जयपूर मध्ये निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे तो अंत्यसंस्कारांना जाऊ शकला नाही.