Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Olichel/Pixabay)

उन्हाचा वाढता तडाखा आणि त्यामुळे प्रवाशांना भासणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अधिक पाण्याचा पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर जादा पाण्याचा बाटल्या प्रवाशांसाठी पुरवण्यात येणार आहे. दररोज एकूण दीड लाख पाण्याचा बाटल्यांचा पुरवठा करण्यात येईल.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे प्रत्येक स्थानकावर थंडगार पाणी माफक दरात देण्यात येणार आहे. उन्हाळ्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन अधिक पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे.

अंबरनाथ येथे असलेल्या रेल नीर प्रकल्पाद्वारे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना पाण्याचा पुरवठा केला जातो. अलिकडेच हा प्रकल्प गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरु करण्यात आला आहे. तसंच नागपूर, भुसावळ आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथे देखील हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तसंच रेल्वेस्थानकांवर बसवण्यात आलेल्या वेडिंग मशिनद्वारे तुम्ही थंडगार पाण्याचा लाभ अगदी मोफत दरात घेऊ शकता.