IPS Rajnish Seth, Rashmi Shukla (PC - Twitter)

New Chairman Of MPSC: एका महत्त्वपूर्ण फेरबदलानंतर महाराष्ट्र पोलिसांचे DGP आणि 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्र राज्यासाठी नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी रजनीश सेठ यांनी या पदासाठी अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्राप्त अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्र्यांकडे विचारार्थ पाठवली होती. (हेही वाचा - Nanded Hospital Tragedy: नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर शिंदे गटाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी डीनकडून स्वच्छ करून घेतलं शौचालय; Watch Video)

या यादीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रजनीश सेठ आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर होते. अखेर या पदासाठी रजनीश सेठ यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, आयपीएस रश्मी शुक्ला या राज्य पोलिसांच्या पुढील डीजीपी बनणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सेठ यांनी पद सोडल्याने शुक्ला यांची राज्य पोलीस दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.