INX Media Case: चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानकडून सीबीआयला नोटीस
पी. चिदंबरम (Photo Credits: PTI)

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी (INX Media Case) माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांच्या जामिनासाठी केलेल्या याचिकेला उत्तर देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी सीबीआयला (CBI) नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 ऑक्टोबर होणार आहे. पी चिदंबर यांची दिल्ली उच्च न्यालायाने (Delhi High Court) जामिन याचिका फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणातील जलद निकाल द्या, अशी याचिका पी चिदंमबर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल केली आहे. सध्या चिदंबरम हे तिहार तुरुंगात (Tihar Jail) कैद आहेत.

आयएनएक्स घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने 20 ऑगस्ट 2019 रोजी पी चिदंमबर यांना अटक केली होती. 19 सप्टेंबर 2019 रोजी विशेष कोर्टाने चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी दुसऱ्यांदा 14 दिवसांसाठी वाढविली होती. न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी पुराव्याशी छेडछाड होऊ नये, यासाठी पी चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळून लावली होती. त्यावेळी विशेष न्यायालयाने चिदंबरम यांना 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पी चिदंबरम यांनी आज शुक्रवारी जामिनासाठी केलेल्या याचिकेला उत्तर देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. हे देखील वाचा- PMC बँक घोटाळप्रकरणी मुंबईत 6 ठिकाणी ED कडून छापेमारी.

ANI चे ट्वीट-

आयएनएक्स मीडिया समूहाला 2007 मध्ये 305 कोटी रुपये विदेशी धन प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाच्या मंजुरीत अनियमितता आढळून आली होती. याचदरम्यान पी चिदंबरम अर्थ मंत्री होते.