PMC बँक घोटाळप्रकरणी मुंबईत 6 ठिकाणी ED कडून छापेमारी

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळाप्रकरणी इडी (ED) कडून मुंबईतील 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणी पीएमसी संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांना गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे

PMC बँक घोटाळप्रकरणी मुंबईत 6 ठिकाणी ED कडून छापेमारी
PMC Bank branch in Mumbai | (Photo Credits: PTI)

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळाप्रकरणी इडी (ED) कडून मुंबईतील 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणी पीएमसी संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांना गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच 3500 कोट्यावधींची संपत्ती सुद्धा जप्त केली आहे. राकेश आणि सारंग यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर जाहीर केले होते. तसेच सरकारने इमिग्रेशन ऑथॉरिटी यांना या दोघांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशन दिले होते. पीएमसी बँक घोटाप्रकरणी 6500 कोट्यावधीचा घपला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच बँकेमधील कर्जाची माहिती लपवण्यासाठी तब्बल 21 हजार खोटी खाती उघडण्यात आली असल्याची धक्कादायक बाब सुद्धा समोर आली होती. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये होती.(PMC Bank Crisis: कंपनीला दिलेल्या कर्जाची माहिती लपवण्यासाठी उघडली होती तब्बल 21 हजार खोटी खाती)

तसेच पीएमसीच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने या बँकेवर पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, बॅंकांना आता कर्ज देणे ठेवी स्वीकारणे यासह मोठ्या आर्थिक व्यवाहारांवर निर्बंध आले आहेत. तसेच आरबीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, आता खातेदार 25 हजार एकाच दिवशी किंवा सहा महिन्यांसाठी रूपयांची रक्कम काढू शकणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2019 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).