महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या मध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिल्यानंतर आज ANI ने मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासाबाबतचे अपडेट्स दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्र एटीएस पथक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूचा तपास करणार आहेत तर NIA या प्रकरणामध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांचा तपास करणार आहे. दरम्यान हे प्रकरण NIA कडे वर्ग करण्यात आल्याचं वृत्त आलं होतं त्यावर एटीएस (ATS) पथकाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून यामधील निम्माच भाग त्यांना देण्यात आल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी मुंबईत विस्फोटांनी भरलेली गाडी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडली होती. महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मनसुख हिरेन गाडीचे मालक असल्याने त्यांना वारंवार पोलिस स्थानकात बोलवले होते. मात्र अचानक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे.
ANI Tweet
Investigation of Mansukh Hiren death case will remain with the ATS and the case related to the recovery of explosives in a car near Mukesh Ambani's house will be probed by NIA, clarifies ATS
— ANI (@ANI) March 8, 2021
मीडीया रिपोर्ट्स नुसार NIA ही राष्ट्रीय तपास यंत्रणा सध्या या प्रकरणी re-registering करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली असल्याचा संशय त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी व्यक्त केल्यामुळे अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी ३०२, २०१, १२० ब अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एटीएसमार्फत सुरु असून तपासाअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशी माहिती अनिल देशमुख यांनी आज विधानसभेमध्ये दिली आहे.