Satara News: राज्यात पावसाने एंन्ट्री मारली असताना पर्यंटकांनी पर्यटनस्थळी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातील एकीव (Ekiv) येथील पाबळ धबधबा (Waterfall) पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील एकीव येथील पाबळ धबधबा पाहण्यासाठी दोन पर्यटकांचा दरीत पडून जीव गमवल्याचे समोर आले आहे. दोन मित्रांचा मृतदेह दरी सापडला आहे. रविवारी दोन मध्यधूंद अवस्थेत असलेले पर्यटक धबधबा पाहण्यासाठी आले होते, त्यांच्या दोघांच भांडण झाल्यामुळे दरित कोसळल्याचे माहिती समोर आली आहे.
संध्याकाळी ६ च्या सुमारास हे दोघेही या ठिकाणी आले. ते दोघेही दारूच्या नशेत असल्याचे स्थानिकांनी माहिती दिली. अक्षय आंबवले व गणेश फडतरे अशी मृत अवस्थेत सापडलेल्या पर्यटकांची नावे आहे. ते दोघेही सातारा जिल्ह्यातील बसाप्पाचीवाडी व कंरजे येथील रहिवासी असल्याचे माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत त्यांनी दोघ्याचे ही भांडण झाले. वादवादीत त्यांच्यात हाणामारी झाली. भांडणाच्या नादात असताना ते धबधब्या जवळील टोकावर गेले. दरम्यान त्यांचा दोघांचाही पाय घसरून खाली पडले. यामुळे त्याचा मृत्यू झाला.
इतर पर्यटकांनी आणि स्थानिकांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिकांनी मेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर हे मदत पथकासह घटनास्थळी धाव घेतला. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत त्यांनी बचाव कार्य सुरू केले. जोरदार पावसामुळे शोध मोहीम घेण्यास अडचणी आल्या अखेर रात्रीच्या उशीरा पाण्यात त्या दोघांचा मृतदेह सापडला . रेस्क्यू टीमने त्या दोघांचा मृत बाहेर काढला. पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद घेण्यात आली.