Navy Vice Chief Vice Admiral G Ashok Kumar (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातल्याने त्याच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांना घरात बसून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी INS Angre या नौदल तळावरील एकूण 38 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याचसोबत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सुद्धा त्यासंबंधित सुचना देण्यात आल्या होत्या. तर आता 38 कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांपैकी 12 जणांना आधीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र 26 जणांवर अद्याप उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु आता युद्धनौका आणि पाणबुडी मधील कोणालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती इंडियन नेव्ही व्हाइस चीफ व्हाइस अॅडमिरल जी अशोक कुमार यांनी सांगितले आहे.

INS Angre नौदलातील 7 एप्रिल रोजी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यामध्ये 20 कर्मचाऱ्यांना ही कोरोनी लागण झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी 130 जणांना सुद्धा क्वारंटाइन करण्यात आले होते.(महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार COVID-19 संक्रमितांची एकूण आकडेवारी, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

तसेच इस्टर्न आणि वेस्टर्न नौदलाचे कंमांड यांनी जहाजाची पाहणी करत आता तेथे कोरोनाचा कोणातच धोका नसल्याचे ही म्हटले आहे. जहाज तैनात करण्यापूर्वीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. आम्ही आमच्या गार्डना निराश करु शकत नाही असे ही अशोक कुमार यांनी म्हटले आहे.(पुण्यात 68 वर्षीय COVID-19 रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या 100)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे राज्य सरकार कडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. केंद्र गृह मंत्रालयाने गुरुवारी देशात लॉकडाउन 4 मे नंतर पुढील दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचसोबत रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार वर्गवारी करण्यात आली असून कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे आदेश काही ठिकाणी शिथिल करण्यात आले आहेत.