संगमनेर: देवेंद्र फडणवीस आणि इंदुरीकर महाराज यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विरूद्ध विधानसभा निवडणूक लढणार?
Devendra Fadnavis And Indurikar Maharaj (Twitter)

संगमनेर (Sangamner) जिल्ह्यात शुक्रवारी भाजपची (Bhartiya Janta Party) महाजनादेश यात्रा पार पडली. या महाजनादेश यात्रेत महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar maharaj) उपस्थितीत होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवतील, अशा चर्चेला उधाण आले आहे. इंदुरीकर महाराज थेट काँग्रेसचे (Congress Party) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या विरोधात संगमनेरमधून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. महाजनादेश यात्रेच्या मार्गावरही ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

शुक्रवारी पार पडलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावर इंदुरीकर महाराज दिसले होते. यामुळे भाजप अगामी विधानसभा निवडणुकीत भाजप इंदुरीकर महारांजाना तिकीट देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. संगमनेर मतदारसंघ हा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. पंचायत समिती, जि.प., नगरपालिका, अनेक ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थावर थोरात यांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. संगमनेर विधानसभेतून बाळासाहेब थोरात सलग ६ वेळा आमदार झाले आहेत. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला १९८२ पासून बाळासाहेब थोरात यांना पराभूत करता आले नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी 1 लाख 03 हजार 564 एवढी मत घेऊन शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा 60 हजारांच्या फरकाने पराभव केला. हे देखील वाचा-सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर; उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर पुन्हा निवडणूक

इंदुरीकर महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध किर्तनकार म्हणून ओळखले जाते. यामुळे इंदुरीकर महाराजांना तिकीट दिल्याने भाजप संगमनेर विधानसभेत बाजी मारु शकतो. या उद्देशाने भाजप इंदुरीकर महाराजांना तिकीट देऊ शकते, असा अंदाज व्यक्त जात आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंनाही निवडणूक लढवण्याची संधी दिली होती.