Maharashtra Lok Sabha Election Results 2024 | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Indian General Election Results 2024: भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीचा (Indian General Election Results 2024) आणि देशाच्या एकूणच राजकीय स्थित्यांतरणाचा अविभाज्य भाग असलेल्या महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांसाठी (Lok Sabha Election Results)सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यातील या 48 जागा देशातील सत्ताकेंद्रासाठी म्हणजेच केंद्र सरकार स्थापण होण्यासाठी कळीची भूमिका निभावतील. लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election Results) मध्ये महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व उलथापालथ घडली. ज्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. परिणामी राज्यात राजकीय मित्र परस्परांचे प्रतिस्पर्धी आणि परस्परांचे राजकीय मित्र प्रतीस्पर्धी झाले. परिणामी राज्यात दोन आघाड्या स्थापन झाल्या. त्यातील एक महायुती जी सध्या राज्यात सत्तेत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडी जी सत्तेवरुन पायऊतार झाली आणि विरोधात गेली. महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) गट समाविष्ट आहे. तर MVA किंवा महाआघाडी सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांनी बनली आहे.

महाराष्ट्रातील ही निवडणूक या वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी विशेष आव्हानात्मक ठरली. दरम्यान, एक्झीट पोल्सनी आपापले अंदाज दर्शवले आहेत. जे तंतोतंत खरे ठरतातच असे नाही. त्यामुळे आज (4 जून) होणाऱ्या मतमोजणीमध्येच वास्तव स्थिती नजरेपुढे येणार आहे. सांगितले जात आहे की, देशातील जनतेचा पहिला कल पहिल्या दोन तासात निश्चित होणे अपेक्षीत आहे. (हेही वाचा, Indian General Election Results 2024: भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी; ऐतिहासिक निकालाकडे जनतेच लक्ष)

एक्झिट पोल्सचा अंदाज

एक्झिट पोल्सनीआपल्या अंदाजांमध्ये महायुतीला अधिक तर महाविकासआघाडी कमी जागा दर्शवल्या आहेत. News18 मेगा एक्झिट पोलने राज्यात एनडीएला 32-35 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 20-23 जागा मिळतील असे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंडिया) गटाला 15-18 जागा मिळू शकतात, ज्यात काँग्रेसला सहा-आठ जागा मिळू शकतात असे भाकीत केले आहे. दरम्यान, एबीपी माझा सीवोटर, आजत तक, चाणक्य यांच्यासह इतर अनेकांनी एक्झिट पोल्सच्या अंदाजात विद्यमान केंद्र सरकार सत्तेत पुनरागमन करेल, असे भाकीत केले आहे. ज्याबाबत देशभरात उत्सुकता आहे.

कोणी किती जागा लढवल्या?

सत्ताधारी महायुतीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 48 पैकी 47 जागा लढवल्या तर एक मित्रपक्षासाठी सोडली. या जागेवरुन राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी उमेदवारी केली.

महायुतीने लढवलेल्या जागा

भाजप-48

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)- 14

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- 05

दरम्यान, महाविकासआघाडीने सर्वच्या सर्व म्हणजेच 48 जागा लढवल्या त्यापैकी पक्षनिहाय लढवलेल्या जागा खालीलप्रमाणे-

शिवसेना (UBT)- 21

काँग्रेस- 17

NCP (SP)- 10

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. राज्यात तीन टप्प्यात मतदान झाले आणि 61.33 टक्के मतदान झाले. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 543 पैकी 353 जागा जिंकल्या आणि एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 52 जागा जिंकल्या. ही कामगिरी काँग्रेससाठी 2014 च्या 44 जागांच्या तुलनेत थोडी सुधारणा दर्शवणारी राहिली. 2019 च्या निवडणुकीत 67.11% मतदान झाले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक नोंदवले गेले.