
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) या 2 दिवसापूर्वी मुंबई येथील लीलावती रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्या होत्या. मात्र, आज पुन्हा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नवनीत कौर यांना रविवारी (16 ऑगस्ट) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तसेच डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या होम क्वारंटाइन राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळल्यानंतर मुंबई महापालिकेने पुन्हा नवनीत कौर यांची कोरोना चाचणी केली असता नवनीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
खासदार नवनीत कौर यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तातडीने नागपूरहून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मुंबई महापालिकेने पुन्हा त्यांची नवनीत राणा आणि रवी राणा यांची करोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. राणा दाम्पत्यांना 15 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. हे देखील वाचा- Ganeshotsav 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
नवनीत कौर राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याने समोर आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर नवनीत कौर यांच्या अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. परंतु, त्रास वाढल्याने त्यांच्यावर नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु झाले. मात्र, प्रकृती अजून खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.