Maharashtra Economic Advisory Council: महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार समितीमध्ये Anant Ambani व Karan Adani यांचा समावेश
Anant Ambani | (Photo Credit - File Image)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी (Karan Adani) यांची महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (Maharashtra Economic Advisory Council) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) ही माहिती दिली आहे.

या परिषदेचे अध्यक्ष टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन असतील. या परिषदेमध्ये एकूण 21 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. सीएमओने सांगितले की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी ऊर्जा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतील, तर अदानी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी हे बंदरे आणि विशेष आर्थिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतील.

इतर सदस्यांमध्ये संजीव मेहता- अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (FMCG), अमित चंद्रा- व्यवस्थापकीय संचालक, बेन कॅपिटल (खाजगी उद्योगांकडून शेअर भांडवल), राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी मुख्य कार्यकारी कार्यालय विक्रम लिमये (बँकिंग), लार्सन अँड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच, व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रमण्यम (अभियांत्रिकी), सन फार्मा (फार्मास्युटिकल्स) व्यवस्थापकीय संचालक दिलीप सांघवी, महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शाह आणि बडवे अभियांत्रिकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत बडवे (उत्पादन) यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Eknath Shinde On MHADA: म्हाडाच्या 389 इमारती पुनर्विकासासाठी पात्र नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य)

EAC हे महाराष्ट्राचे  $1-ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कृषी, बँकिंग, अभियांत्रिकी आणि शिक्षण या विषयांवर लक्ष केंद्रित करणारी ही खासगी संशोधन संस्था म्हणून काम करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले.