राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यापर्यंत अनेक राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली होती. आता महाराष्ट्रात रस्सीखेच चालू आहे ती सत्ता स्थापनेची. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena-BJP) यांची युती तुटल्यावर आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस (NCP-Congress) फ्रंटफुटवर खेळत असताना दिसत आहेत. महाशिवआघाडी राज्यात सत्ता स्थापन करेल हे जवळजवळ निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका पार पडत आहेत. अशीच राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची एक बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीची एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या बैठकीतील, ‘पाऊस थांबला हे बरे झाले, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरे झाले’, हे वाक्य हायलाईट ठरत आहे. लोकसत्ताने याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
उद्या शरद पवार दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आज पुण्यात जमले होते. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र नंतर चर्चेचा नूर बदलला आणि ती वळली ती टिकटॉक व्हिडीओ आणि मिम्सवर. देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल असे चिन्ह काही दिसत नाही. याच परिस्थितीबद्दल टिकटॉकवर अनेक व्हिडीओ, तर सोशल मिडीयावर मिम्स बनवले जात आहेत. अशाच एका मिम मध्ये ‘पाऊस थांबला हे बरे झाले, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरे झाले’, हे वाक्य होते, याची चर्चा या मिटिंग मध्ये झाली. (हेही वाचा: सरकार कुणाची? शिवसेनेची! बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर आले असताना शिवसैनिकांची घोषणाबाजी (Watch Video)
Pune: Core committee meeting of Nationalist Congress Party (NCP) underway at party chief Sharad Pawar's residence. #Maharashtra pic.twitter.com/1iQ2OOnjkM
— ANI (@ANI) November 17, 2019
याबैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, आमदार धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य हजर होते. या सर्व नेत्यांनी आपण पाहिलेले व्हिडीओ आणि मिम्सचे किस्से या चर्चेमध्ये शेअर केले आहेत.