
गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर (Daughter) वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केल्याप्रकरणी ठाण्यातील (Thane) शहापूर पोलिसांनी (Shahapur Police) बुधवारी एका 45 वर्षीय व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. पीडित 13 वर्षीय तरुणीने पोलिसांना सांगितले की, ती गर्भवती राहिली आणि गेल्या महिन्यात तिचा गर्भपात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याची पत्नी जानेवारीमध्ये वेगळे झाले. त्यानंतर तो माणूस आणि त्याची मुलगी शहापूरला राहू लागले. तर मुलीची आई आणि लहान बहीण ठाणे जिल्ह्यातील खर्डी (Khardi) येथे राहू लागले. या महिन्याच्या सुरुवातीला, आरोपीच्या काही शेजाऱ्यांनी मुलीच्या आईशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की मुलगी अस्वस्थ आहे.
ऑक्टोबरमध्ये तिला खूप वेदना होत आहेत, असे सांगितले. आईने ताबडतोब तिला फोन केला आणि तिच्या गरोदरपणाची माहिती मिळाली. कोणत्याही वैद्यकीय सेवेअभावी तिने मूल गमावल्याचे मुलीने तिच्या आईला सांगितले, असे पोलिसांनी सांगितले. शहापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे म्हणाले, जेव्हा मुलीची आई तिला भेटायला गेली तेव्हा तिला सांगितले की तिचे वडील फेब्रुवारीपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आहेत. हेही वाचा ED Raid On Arjun Khotkar: औरंगाबादमध्ये शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी
घाबरलेल्या आईने मुलीला तिच्या घरी नेले आणि मंगळवारी खर्डी पोलिसांशी संपर्क साधला. जिथे आरोपीविरुद्ध प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आला. हा गुन्हा त्यांच्या हद्दीत घडल्याने एफआयआर मंगळवारी रात्री उशिरा शहापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तिने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
आम्ही तातडीने आरोपीला चौकशीसाठी उचलले आणि त्यानंतर बुधवारी सकाळी त्याला अटक केली. आम्ही त्याच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत बलात्काराचा आरोप ठेवला आहे. त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे उपासे यांनी सांगितले.