Maharashtra: जळगावात मकर संक्रतीच्या सणा दिवशी दोन दुर्देवी घटना, पंतगांनी घेतला दोन मुलांचा जीव
(संग्रहित प्रतिमा)

मकर संक्रारातीच्या सणा दिवशीच जळगावमध्ये (Jalgaon) दुर्देवी घटना घडली आहे. पतंग (Kites) उडवताना विजेचा धक्का लागून आठ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा गावाती आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हितेश पाटील (वय 8) असे मृत मुलाचे नाव आहे. हितेश आज त्याच्या काही मित्रांसोबत घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. त्याचवेळी त्यांचा पतंग घराजवळील तारांमध्ये अडकली. पतंग बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना हितेशचा पाय विजेच्या तारेवर आदळला. त्यामुळे हितेशला विजेचा जबर धक्का बसला.

यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांला आधीच मृत घोषित म्हणुन केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पतंग उडवताना अनेकदा कापलेला पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतो. अडकलेला पतंग लोखंडी रॉड किंवा गिरगिटाच्या साह्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येते. तथापि, अशा परिस्थितीत, विद्युत दोर अनेकदा स्पर्श करू शकतात. (हे ही वाचा Wardha: 13 वर्षीय मुलीच्या गर्भपात आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल, 5 आरोपींना अटक केल्याची माहिती)

दुसरी घटना शहरातील कांचननगरात घडली. पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून यश रमेश राजपूत यानं झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना घडल्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.